तुकूम घाटावरुन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला महसूल विभागाने केले जप्त

223

तुकूम घाटावरुन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला महसूल विभागाने केले जप्त

 

 

 

धानोरा : तालुक्यातील तुकूम येथील रेतीघाटावरुन रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेण्यात आले. दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासहा वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. सध्या ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर क्रमांक Mh33 f 4823 हा गणेश बळीराम मोटघरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे. हि कारवाई नायब तहसीलदार डी. के. वाळके यांनी धानोरा तालुक्यातील तुकूम येथे केली यावेळी मंडळ अधिकारी सरपे, नितीन नंदावार, कोतवाल हलामी उपस्थित होते पुढील प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत