आरेवाडा येथे कृषी मेळावा व कृषी प्रदर्शन

124

आरेवाडा येथे कृषी मेळावा व कृषी प्रदर्शन

भारत सरकारच्या नीती आयोगामार्फत चालवल्या जाणाऱ्या आकांक्षीत तालुका कार्यक्रम अंतर्गत दिनाक 6ऑक्टोबर रोजी तालुक्यातील आरेवाडा,येथे तालुका कृषी अधिकारी भामरागड च्या वतीने कृषी मिळावा व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

व मेळाव्यात व्याख्याते म्हणून कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बोथीकर यांनी भात पिकावर कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लवटे यांनी शेतकरी उत्पादक संघाचे महत्व व विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी भाकरे उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.या प्रदर्शनीत विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स व अवजारे पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत मिळण्याच्या विविध मशिनरी, तालुका कृषी कार्यालयामार्फत विविध पौष्टिक तृणधान्य बियाणे 50% सवलतीवर फवारणीची औषधी, कृषी सेवा केंद्राचे स्टॉल, महिला गटाचे स्टॉल,पंचायत समिती कृषी यांचे स्टॉल, पशुसंवर्धन विभागाचे स्टॉल कृषी प्रदर्शनी मध्ये ठेवण्यात आले होते.

याप्रसंगी तहसीलदार पप्पुलवार,गटविकास अधिकारी मगदूम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भूषण चौधरी, तालुका कृषी अधिकारी सुरजागडे, कृषी अधिकारी पंचायत समिती राजनहिरे, गायकवाड, विस्तार अधिकारी कृषी तसेच तालुका कृषी कार्यालयाचे सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.