*मौजा.पाथरी येथे कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शिबीरला गावकाऱ्यांचा भरपूर प्रतिसाद*
*दिनांक:- १०/१०/२३*
*सावली(ता.प्र)*
*सावली तालुक्यातील मौजा.पाथरी येथे विजयकिरण फाउंडेशन तर्फे आयोजित कॅन्सर तपासणी हॉस्पिटलचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.आज पाथरी केंद्रावर सायमारा,मुंडाळा,पाथरी,भानापूर, सावंगी दीक्षित,करगाव या गावातिल नागरिकांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले.यावेळी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला व भरभरून प्रतिसाद दिला.*
*कॅन्सर तपासणी शिबिराप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मा.राजूभाऊ सिद्धम,सावली तालुका काँग्रेस कमीतीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,माजी उपसभापती पं.स.सावली मा.राजेंद्र भोयर, गाव काँग्रेस कमिटी पाथरीचे अध्यक्ष मा.मोहित मेश्राम,महिला ग्राम काँग्रेस कमिटी पाथरीच्या अध्यक्षा श्रीमती लताताई वडलकोंडवार, गाव काँग्रेस कमिटी करगावचे अध्यक्ष मा.चुडीराम कोलते, युवक काँग्रेस कार्यकर्ते मा.सचिन शेंडे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.अमितकुमार ठीकरे,मा.सचिन कसारे,मा.रोशन ठीकरे,मा.मारोती ठीकरे,मा.खुशाब ठीकरे,मा.अनिल मडावी,मा.वसंत भैसारे,सौ.आशाताई हजारे,सौ.पौर्णिमा लोडेल्लीवार,सौ.वर्षा काटलाम,मा.रोशन कोहळे,सौ.अर्चना कुंभरे,मा.अनिल कुंभरे,स्वामी मडावी,मा.मुकेश मेश्राम आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते.*




