Home Breaking News *गुंतवणूक, वृध्दी, निर्यात व एक जिल्हा एक* *उत्पादनबाबत*  *इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेचे...

*गुंतवणूक, वृध्दी, निर्यात व एक जिल्हा एक* *उत्पादनबाबत*  *इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेचे आयोजन*

82

*गुंतवणूक, वृध्दी, निर्यात व एक जिल्हा एक* *उत्पादनबाबत*

*इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेचे आयोजन*

 

गडचिरोली,(जिमाका)दि.11: उद्योग व उद्यमशिलता विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा व जिल्हयातील निर्यातक्षम उद्योग निर्माण व्हावे यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, एम.सी.ई.डी. , सिडबी, आयडीबीआय कॅपिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने होटेल लॅन्डमार्क, येथे गुंतवणूक, वृध्दी, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन यावर सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमावर इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे उदघाटन अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड उपस्थित होते.

सर्वप्रथम अति.जिल्हाधिकारी, धनाजी पाटील यांनी जिल्हयातील उद्योगांना, नव उद्योजकांना, शेतकरी सहकारी संस्था व जिल्हयाच्या विकासात्मकदृष्टीने कसा भर देता येईल, याबाबत

मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस आशिष मुनघाटे-व्यवस्थापक सिडबी यांनी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी सिडबी अंतर्गत असलेल्या योजनांची माहिती दिली. जी.बी.लाडे-उद्योग उपसंचालक, मुंबई यांनी मैत्री पोर्टल व मैत्री कायद्याबध्दल माहिती दिली. मैत्री कायद्या अंतर्गत एक खिडकी योजने अंतर्गत एकाच ठिकाणी उद्योग व्यवसायीकांना विविध विभागाच्या परवानगी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

उमेश रनोलीया-वरिष्ठ कार्यकारी यांनी आयडीबीआय कॅपीटल बध्दल मार्गदर्शन केले. सीपेटचे श्री. कार्तिक यांनी प्लॉस्टीकचे पूर्नवापर करुन वेगवेगळया वस्तू निर्माण करण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. मनिष गणविर यांनी बार्टी अंतर्गत घेण्यात येणा-या प्रशिक्षणाबध्दल सविस्तर माहिती दिली. पंकज कामडी-मार्केटींग एक्झीकेटीव्ह इंडिया पोस्ट डाकघर निर्यात केंद्राबध्दल माहिती दिली. युवराज टेंभूर्णे- जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थाक यांनी एमएसएमई योजना व कर्ज प्रकरणाबातची माहिती दिली. कृषि अधिक्षक, बस्वराज मास्तोळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

सदर कार्यशाळेस आरसेटीचे कैलास बोनगीरवार, माविमचे सचिन देवतळे, कौशल्य विकास विभागाचे, श्री. शेन्डे भास्कर मेश्राम हे उपस्थित होते.

जिल्हयातील लघु उद्योगांना चालना मिळावी व निर्यातक्षम उद्योग निर्माण व्हावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत १५० हून अधिक उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्यागिक समुह, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक सदर कार्यशाळेत उपस्थित होते.

00000

Don`t copy text!