*वनरक्षकावर कारवाईसाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन*
गडचिरोली मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील आंबेशिवणी येथे ग्रामसभेची परवानगी न घेताच संयुक्त वनसमिती गठित करून गैरव्यवहार केला, या प्रकरणी वनरक्षकावर कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी ५ ऑक्टोबरपासून वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे.
संयुक्त वन व्यवस्थापन समिती ही ग्रामपंचायतची उपसमिती असते. समिती स्थापन करताना ग्रामसभेची परवानगी अनिवार्य आहे. परंतु, वनरक्षकांनी पदाचा दुरुपयोग करीत स्वत:च्या मर्जीने कागदोपत्री संयुक्त वनव्यवस्थापन समिती तयार करून पैशाचा दुरुपयोग केला. दुरुपयोग झालेल्या पैशाची तात्काळ चौकशी करावी या मागणी करिता वनरक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.वनरक्षक दुर्गे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी यासाठी ११ ऑक्टोबर ला मुख्य वनरक्षक कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी ढोल बजाव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
आजच्या ढोल बजाव आंदोलनाला सातव्या दिवशी आंदोलन स्थळी योगाजी कुडवे,नीलकंठ संदोकर, आकाश मट्टामी,धनंजय डोईजड, रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम,विलास भनारकर,विलास धानफोले,रवींद्र धानफोले, अमोल झंझाड, सुनील बावनवाडे, मोतीराम चांद्रगिरे,मुरली गोडसुलवार, तुळशीराम मेश्राम आदी सहभागी आहेत. वनरक्षक दुर्गे यांच्यावर निलंबनाची कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा योगाजी कुडवे यांनी दिला आहे.




