*!!चामोर्शी शहरात सर्व पक्षीय रास्ता रोको व ठीया आंदोलन!!*
*!! सुरजागड लोहखानीतील अवजड वाहतुकीमुळे मुल- चामोर्शी रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात चामोर्शीत नागरीक झाले आक्रमक !!*
*!! तात्काळ सुरजागड लोहखनिजांची अवजड वाहतूक बंद करून मुलं – चामोर्शी रस्त्यांची दुरुस्ती करा अन्यथा चामोर्शी तालुका बंद व बेमुदत रास्ता रोको करण्याचा नागरीकांकडून प्रशासनाला ईशारा!!*
*चामोर्शी :- दिनांक १३/१०/२०२३*
*गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखानीतून अवजड वाहतूक चामोर्शी तालुक्यातून रस्त्यावर होत असुन अनेक राज्यांत त्याची वाहतूक करण्यात येते मात्र रस्त्यांची वाहतुकीची क्षमता कमी असल्यामुळे अवजड वाहनांमुळे रस्त्यांची चाळण झालेली असून मोटरसायकल चालक व कार चालक यांचे मोठे हाल असून मोठ्या प्रमाणात अपघात होवुन अनेक लोकांना आपला जिव गमवावा लागला वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे याविरोधात नागरिकांत मोठा असंतोष असुन प्रशासनाबाबत मोठी चिड असून स्थानिक लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे जनतेमध्ये प्रचंड रोष आहे व याविरोधात सर्व पक्षीय नागरीकांकडून तात्काळ सुरजागड लोहखनिजांची अवजड वाहतूक बंद करून मुलं – चामोर्शी रस्त्यांची दुरुस्ती करा अन्यथा चामोर्शी तालुका बंद व बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांच्याशी मोबाईल वर संपर्क करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याचे व अवजड वाहतूक बंद करण्याचे निर्देश खासदार महोदयांनी दीले*




