अवैध रेतीतस्करी करणारे 2 ट्रॅक्टर जप्त,महसूल विभागाची कारवाई

धानोरा: येथील महसूल विभागाला ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैधरित्या तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, गडचिरोली जिल्ह्यातील धानोराचे तहसीलदार आम्रपाली लोखंडे यांच्या मार्गदर्शनात धानोरा तालुक्यातील चातगाव – रांगी मार्गावरील खुर्सा गावानजीक रेती भरलेले दोन ट्रॅक्टर जप्त केल्याची कारवाई शनिवारला सकाळी 8 वाजता करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील चातगाव ते रांगी मार्गाने ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती धानोरा महसूल विभागाला मिळताच, या मार्गावर सापळा रचला असता, एमएच 33 जी 3072 क्रमांकाचा व एक विना नंबरच्या ट्रॅक्टरद्वारे
विना परवाना रेतीची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. सदर ट्रॅक्टरवर कारवाई करून ते तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर ट्रॅक्टर चातगाव येथील राजू किसन सैनमारे, सुरेश सैनमारे यांच्या मालकीचे आहेत. सदर कारवाई तहसीलदार आम्रपाली लोखंडे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार डी. के. वालके, पुरवठा निरीक्षक नितीन नंदावार, वनश्याम येरमे यांनी केली.




