सामाजिक कार्यकर्ता योगाजी कुडवे यांच्या आंदोलनाला यश, अखेर वनरक्षक निलंबित
आजपर्यंतच्या आंदोलन व तक्रारीच्या माध्यमातून १९ अधिकारी व कर्मचारी निलंबित
गडचिरोली: आंबेशिवनी येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करताना ग्रामसभेची परवानगी न घेता स्वतःच्या मनमर्जीने समिती स्थापन करून आपल्या मर्जीतील लोकांना समितीमध्ये घेऊन समिती स्थापन केली तसेच समितीच्या नावाने बँकेत खाता तयार करून बँकेत रक्कम जमा करण्यात आली तसेच बँक चेकवर सह्या करून दुकानदाराच्या नावाने चेक देऊन पैशाची अपराधपर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनरक्षक दुर्गे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा ,या मागणीसाठी दिनांक 5 ऑक्टोंबर 2023 पासून मुख्य वन संरक्षक कार्यालयं गडचिरोली समोर बेमुदत आंदोलन सूरू होतें.आज आंदोलनाच्या 12व्या दिवसी वनरक्षक राजेश दुर्गे यांचे निलंबन करण्यात आले. निलंबनाचे आदेश देऊन आंदोलनांची सांगता करण्यात आली. यावेळी आंदोलनात आंदोलन कर्ते सामाजिक कार्यकर्ता योगाजी कुडवे,रवींद्र सेलोटे, आकाश मत्ट्टामी,नीलकंठसंदोकर,चंद्र शेखर सिडाम,विलास भानारकर,विलास धानफोले,रवींद्र धानफोले,अमोल झनजाड,सुनील बाबनवाडे,मोतीराम चंद्रगिरे,मुरली गोडसुलवार,तुळशीराम मेश्राम, दिलीप झंजाड,रघुनाथ सिडाम,
आदी उपस्थित होते..




