*गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करा*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांचे निवेदन*
*जिल्ह्याच्या विकासासाठी २५-१५ व इतर विकास अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची विनंती*
*मुंबई मंत्रालयात भेट घेऊन दिले निवेदन*
*दिनांक १८/१०/२०२३ मुंबई*
*गडचिरोली जिल्ह्यामध्ये एका ग्रामपंचायती अंतर्गत ५ ते ७ गावे असून गावांमधील अंतर बराच लांब असल्याने ग्रामपंचायती अंतर्गत कामांकरिता स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा ग्रामपंचायतिंचे विभाजन करून नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे केली आहे.*
*यावेळी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाकरिता २५-१५ अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याचीही विनंती केली.*




