*वडसा- गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन मार्गाचा सुधारित 52.68 कि.मी. (प्रकल्पाच्या खर्चाच्या 50 टक्के (944 कोटी) प्रस्तावास राज्य सरकारची मंजूरी मिळणेबाबत खासदार श्री. अशोकजी नेते यांनी मुंबई येथे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.*
—————————————-

गडचिरोली:-खासदार अशोक नेते 2011 पासून नेहमी सतत रेल्वे संबधीत रखडलेले प्रश्न, पाठपुरावा,प्रयत्न करित असतात तसेच संसदेत सुद्धा प्रश्न उपस्थितीत करून अंमलबजावणी करिता प्रभावीपणे मांडतात, वडसा गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन 52:88 कि.मी. 2011-2012 मध्ये महाराष्ट्र सरकार व रेल्वे मंत्रालय यांच्यात 50 50 टक्के खर्च शेअरिंग तत्वावर मंजूर करण्यात आलेला आहे. आक्टोबर 2019 मध्ये प्रकल्पाचा अंतीम मंजूर आदेशाचे मुल्य 852.10 कोटी आहे. वन्यजीवाच्या संरक्षणाचा विचार करता प्रकल्पाची अपेक्षीत किंमत 1096.00 कोटी होती.
1096 कोटीच्या खर्चाच्या 50 टक्के वाटणीसाठी संदर्भ अंतर्गत राज्य सरकारची संगती प्राप्त झाली. प्रकल्पामध्ये 132 हेक्टर जमीन, 17 हेक्टर सरकारी जमिन तसेच 72 हेक्टर वन्य जमिनीचे मुसंपादन पुर्ण झाले आहे. कोंढाळा स्थानकावर पॅसेंजर हॉल्ट वरून कॉसिंग स्टेशन मध्ये रूपांतर करण्यासाठी व वन्यजीव प्रतिबंधात्मक उपायाचे पालन करण्यासाठी वनक्षेत्रातील निर्मितीची उंची काही अतिरिक्त जमिनीची आवश्यक असलेल्या कामाची निविदा प्रक्रिया चालू झाली आहे. या सर्व बाबीमुळे प्रकल्पाची किंमत आता वाढून 1888.00 कोटी झाली आहे. या प्रकल्पावर जुन 2023 पर्यंत 231.28 कोटी खर्च झाले आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकार ने फक्त 75.63 कोटी रूपये दिलेले आहे.
करीता खासदार अशोकजी नेते यांनी या संबधीत वडसा- • गडचिरोली ब्रॉडगेज रेल्वे लाईनच्या वाढीव अंदाजाच्या मंजुरीची प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पाच्या खर्चाच्या 50 टक्के (944 कोटी) शेअर करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी देण्यात यावी या संबधीत माहिती
खासदार अशोक नेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांना मुंबई येथे भेट घेऊन चर्चा करत निवेदन सादर केले.




