*चामोर्शी येथील गरबा नृत्य स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न..*
—————————————-
दि.२० ऑक्टोंबर २०२३
चामोर्शी:- गरबा नृत्य स्पर्धा स्वागतम दुर्गा उत्सव मंडळ बाजार चौक यांच्या वतीने चामोर्शी येथे आयोजित करण्यात आले होते.
या गरबा नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना गरबा नृत्य ही स्पर्धा सर्व प्रथम गुजरात मध्ये खेळल्या जात होते.यानंतर हळूहळू आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन या दुर्गा उत्सवा निमित्ताने गरबा नृत्य युवक खेळतात या गरबा नृत्याने शारीरिक व्यायाम होते. विविध समाज धर्मातील मूले मुली युवक एकत्र येतात. आनंददायी वातावरणात नृत्य करतात. असे खासदार अशोकजी नेते यांनी याप्रसंगी प्रतिपादन केले.
या गरबा स्पर्धेचे प्रथम बक्षीस खासदार यांचेकडून (३०००१/-) तीस हजार एक रुपये ,द्वितीय बक्षीस नगरसेवक आशिष पिपरे यांचे कडून (२०००१/-)विस हजार एक रुपये, तृतीय बक्षीस डॉ. मिलिंद नरोटे यांचेकडून १५००१/- पंधरा हजार एक रूपये अशा पद्धतीने आयोजित करण्यात आले होते.
—————————————-
*खासदार अशोकजी नेते यांनी चामोर्शी येथे विविध ठिकाण च्या दुर्गा मातेचे घेतले दर्शन*
खासदार अशोकजी नेते यांनी ता.चामोर्शी येथील जय शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ वाळवंटी चौक,माऊली माता मंदिर मार्कंड मोहला,स्वागतम दुर्गा उत्सव मंडळ बाजार चौक चामोर्शी या विविध ठिकाणी खासदार अशोक नेते यांनी दुर्गा मातेचे दर्शन घेत पूजा अर्चना करत आरती केली. यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी माता चरणी नतमस्तक होऊन जनतेला सुख- समृद्ध, आरोग्यदायी संपन्न लाभो अशी प्रार्थना केली.
याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, नगरसेवक तथा सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे,चंद्रपुर जिल्हा ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल, शहराध्यक्ष सोपान नैताम, माजी जिल्हा न्यायाधीश दीक्षित साहेब, नगराध्यक्षा जयश्री वायलवार, नगरसेविका रोशनी वरघंटे, नगरसेविका सोनाली पिपरे,नगरसेविका त्रेमाताई आईचवार,जेष्ठ नेते माणिक कोहळे,ओबीसी नेते भाषकर भूरे,आदिवासी आघाडीचे रेवनाथ कुसराम,विजय गेडाम,रवि खरवडे,कवेशवर आईचवार, अमोल आईचवार,पंकज वायलवार,प्रतिक राठी, सोशल मिडीयाचे रमेश अधिकारी तसेच मोठ्या संख्येने युवक वर्ग व नागरिक उपस्थित होते.




