*_मा.खासदार अशोकजी नेते यांची चामोर्शी येथील खासदार जनसंपर्क व तक्रार निवारण कार्यालयास सदिच्छा भेट_*..
—————————————-
*_याप्रसंगी माजी सेवानिवृत्त नायब तहसील हनुमंत डंबारे यांचा खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वात भाजपात पक्ष प्रवेश_.*..
दि.२९ ऑक्टोंबर २०२३
चामोर्शी:- तालुक्यातील जनतेच्या समस्या,अडीअडचणी,विविध छोटी मोठी कामे,नागरिकांशी संपर्क या इतर बाबी लक्षात घेऊन खासदार अशोकजी नेते यांनी चामोर्शी येथे जनसंपर्क व तक्रार निवारण कार्यालयाचा उद्घाटन लोकनेते, विकास पुरुष,राज्याचे झुंजार,तडफदार नेतृत्व, मा.ना.श्री. सुधिर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने,सांस्कृतिक कार्य,व मत्स्य व्यवसाय म.रा.यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या नंतर खासदार अशोकजी नेते यांनी आज दिं. २९ ऑक्टोंबर २०२३ रोजी रविवार ला तालुका मूलचेरा दौऱ्यां प्रंसंगी जात असतांना चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन चामोर्शी तालुक्यातील पदाधिकारी यांच्याशी संपर्क करुन भेटी गाठी घेत संघटनात्मक चर्चा केली.
याप्रसंगी माजी सेवानिवृत्त नायब तहसील हनुमंत डंबारे यांचा खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वात भाजपात पक्ष प्रवेश केला.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खासदार नेते साहेब आगे बढ़ो,हम तुम्हारे साथ है असा जयघोष करत भारतीय जनता पार्टी चा विजयी असो असा उत्साह निर्माण केला,
या प्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते सोबत जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे,माजी जि.प. अध्यक्ष तथा भाजपाचे नेते समया पसूला,तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर,शहराध्यक्ष सोपान नैताम,संचालक कृ.उ.बा.स.रमेश बारसागडे, बंगाली आघाडी चे नेते दिपक हलदार,जेष्ठ नेते माणिक कोहळे,माजी सेवानिवृत्त नायब तहसिलदार हनुमंत डंबारे, आदिवासी आघाडीचे महामंत्री रेवनाथ कुसराम,ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री भास्कर बुरे,नरेश अलसावार,विजय गेडाम,राजू धोडरे,शेषराव कोहळे, वासुदेव चिचघरे,विलास चरडूके,डोमदेव वनेवार,निरज रामानुजमवार, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.