*_खासदार अशोक नेते यांनी तेलंगणात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले चार्ज.._*
———————————-
*तीन विधानसभा निवडणुकीची जबाबदारी*
दिं. ०७ नोव्हेंबर २०२३
गडचिरोली – भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी आज मंगळवारी तेलंगणा राज्यातील जिल्हा निर्मल,खानापुर,मुधोल या विधानसभा येथे बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुखांसह भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा कसा विजय होईल यासाठी मार्गदर्शन केले. येत्या ३० नोव्हेंबरला तेलंगणा राज्यात एकूण:-११९ विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. खासदार नेते यांच्याकडे निर्मल, मुधोल आणि खानापूर या तीन विधानसभा मतदार संघांचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या तीनही मतदार संघात भाजपचे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी पूर्ण निष्ठापूर्वक दिलेली जबाबदारी पार पाडावे, असे आवाहन करत खा.नेते यांनी कार्यकर्त्यांना चार्ज केले.
यावेळी निर्मल जिल्ह्यातील खानापुर क्षेत्रातील भाजपचे पदाधिकाऱ्यांनी खासदार अशोकजी नेते यांचे पुष्पहाराने स्वागत करत शाल श्रीफळ देऊन मानसम्मान केला. भारतीय जनता पार्टी चा विजय असो असा जयघोष केला.
या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हा निर्मलचे विधासभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री मेडीसेमे राजू,विस्तारक विलास गादे,जनरल सेक्रेटरी सामा राजेश्वर रेड्डी,आयना गहारी बोमया आदिलाबाद विधानसभा प्रमुख, खानापूर क्षेत्राचे मुख्य इंचार्ज रितेश राठोड,सहाय्यक इंचार्ज संजीव साती,खानापुर क्षेत्र विस्तारक महेंदर अंकम,विस्तारक नल्ला रेड्डी,व्यंकट रमाराव, बुरा रमेश,रविंद्र रेड्डी, महामंत्री मल्ला रेड्डी,लिमबारदी, देसाई रामू,तसेच भाजपा पदाधिकारी, आघाडीयांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.



