_*चौगान येथे खास दिपावलीच्या शुभपर्वावर कथासार गोंधळाचे आयोजन*_

124

_*चौगान येथे खास दिपावलीच्या शुभपर्वावर कथासार गोंधळाचे आयोजन*_

 

_*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*_

 

_ब्रम्हपुरी_

_तालुक्यातील चौगान येथिल मानकादेवी मंदिराच्या बांधकाम मदतीकरिता खास दिपावली उत्सवानिमीत्त मानकादेवी सभागृह माना मोहल्ला चौगान येथे न्यू पंचरंगी पार्टी, टेकेपार तालुका चिमूर प्रस्तुत कथासार गोंधळ व चौगान कर्मचारी वृंद चौगान तर्फे गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त कर्मचारी सत्कार सोहळा दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोज मंगळवार रोजी रात्रौ 8 वाजता आयोजित करण्यात आला होता. *या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.* कार्यक्रमाच्या सुरवातीला स्टेजपूजन चौगानचे माजी पो. पा. किशोर तिडके, उद्योजक विजय भागडकर मुंबई, शरद चौधरी उपलेखापाल चिमूर, मंगेश कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले._

_या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उमेश धोटे सरपंच चौगान तथा संचालक कृ.उ.बा.स. ब्रम्हपुरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून प्रमोद मैंद मुख्या. कृ. वी. चौगान, प्रा. अंकुश मातेरे उपसरपंच चौगान, सुधीर राऊत सर, रामकृष्ण चौधरी सर, पुरुषोत्तम बांगरे सर, प्रकाश तोंडरे ग्रामसेवक, राजेश्वर देव्हारी, उपाध्यक्ष म्हणून अरविंद राऊत सर, रतीराम चौधरी ग्रामसेवक, प्रफुल भाकरे, सुरज शिवणकर, सुभाष नन्नावरे, संजय नन्नावरे, दिवाकर नन्नावरे उपस्थित होते. प्रमूख अतिथी म्हणून सुमित आठोळे, राजेश्वर देव्हारी, उद्धव भोगेवार, अरविंद बुराडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते._

_या कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी बोलतांना प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, चौगान गाव हे कर्मचारी निर्माण करणारे गाव आहे. प्रत्येक गावात कर्मचारी वर्ग असतो परंतु चौगानमधे गावाचा विकास होण्यासाठी कर्मचारी वर्गाने एकत्र येत ज्या संघटनेची स्थापना केली आहे ती तालुक्यातील एकमेव संघटना आहे. गावात नाटके होत आलीत होत राहणार, परंतु इथल्या कर्मचारी वर्गाने जो विद्यार्थ्यांचा सत्कार व नवोद्योजकांना प्रेरणा देणारा कार्यक्रम आयोजित केला आहे. तो खरच खूप स्तुत्य उपक्रम आहे. त्यांचे हे कार्य तालुक्यातील इतरांना प्रेरणा देणारे आहे. असे प्रतिपादन केले._

_या कार्यक्रमप्रसंगी गावातील वर्ग 4 ते 12 पर्यंत वर्गातून प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा व विशेष प्रविण्याप्राप्त विद्यार्थी यांचा ट्रॉफी व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच यावर्षी शासकीय नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामधे पोलिस उपअधीक्षक (मोटर परिवहन)पदी नियुक्ती होणाऱ्या रामानंद कळसकर, वस्तूकर सहायक पदी नियुक्ती होणाऱ्या लतिष बन्सोड, भारतीय रेल्वेत निवड झालेल्या निता नन्नावरे,महाराष्ट्र पोलीस विभागात निवड झालेल्या प्रफुल नन्नावरे व नवोद्योजक विजय भागडकर, मनोज चंदनबावणे, शुभम भोगेवार, महेश चौधरी, सिकंदर चौधरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रहास बुराडे सर, प्रास्ताविक हिरालाल बन्सोड सर व आभार रामकृष्ण चौधरी सर यांनी मानले. चौगानवासिय जनतेने न्यू पंचरंगी पार्टी, टेकेपार तालुका चिमूर प्रस्तुत कथासार गोंधळ कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले._