*_धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणे काळाची गरज खासदार अशोक नेते_*
————————————-
*_मौजा – दुर्गापुर ता.चामोर्शी येथे कटपुतली कुतूहल डान्सच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते._*
दि.१५ नोव्हेंबर २०२३
चामोर्शी:तालुक्यातील मौजा – दुर्गापुर येथे श्री. श्री. सार्वजनिक कालीमाता पूजा उत्सवाच्या निमित्याने कटपुतली कुतूहल डान्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना श्री.श्री.सार्वजनिक कालीमाता पूजा उत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने आनंदाने गावातील व या परिसरातील मराठी गावे सुद्धा एकत्रीत येऊन हा कालीमाता उत्सव साजरा करीत असतात. अशा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणे आजच्या काळाची गरज आहे. धार्मिक कार्यामुळे मन, चित्त, शरीर,एक असतो. धार्मिक कार्यामुळे मनाची एकाग्रता राहते त्यामुळे वाईट विचार मनात येत नाही.त्यासाठी अशा कार्यक्रमाची आयोजन करणे आवश्यक आहे.
या प्रसंगी गावातील समस्या सुद्धा जाणून घेतल्या या गावाच्या विकासाकरिता प्रयत्नशील राहील.असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक जी नेतें यांनी केले.
यावेळी खासदार अशोकजी नेते यांचे शाल श्रीफळ देऊन मानसन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालन तालुका महामंत्री विनोद गौरकर यांनी केले.
या प्रसंगी मंचावर प्रामुख्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, बंगाली समाज आघाडीचे अध्यक्ष दीपक हलदार,माजी पं.स. उपसभापती मनमोहन बंडावार, भाजपा तालुका महामंत्री विनोद गौरकर, दुर्गापूरच्या सरपंच सोनीताई मंडल,ग्रा.पं.सदस्या सरस्वती सेन,माजी पो.पा.फगेंद्र बहादूर, प्रकाश मंडल,दुलाल मंडल,सुनिल मंडल,विमल सेन,कालीपद मंडल, शुभम मंडल,माधव मिस्त्री, तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक भक्त गण उपस्थित होते.



