40 गावातील नागरिकांकरिता एक दिवस समाजासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन।  जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ.प्रमोद खंडाते

75

40 गावातील नागरिकांकरिता एक दिवस समाजासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन।

 

जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ.प्रमोद खंडाते

 

हजारो आदिवासी समाज बांधवांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

 

,अंधश्रद्धा ,व्यसनमुक्ती जनजागृती, समाज प्रबोधन, विद्यार्थी करिता शैक्षणिक डॉ.प्रमोद खंडाते यांचे उपस्थितांना मार्गदर्शन

 

दि.17/11/2023

 

गडचिरोली: गोंडवाना गोंड समाज जय सेवा कर्मचारी संघटना 40 गावातील नागरिकांकरिता एक दिवस समाजासाठी या उपक्रमा अंतर्गत समाज प्रबोधन,अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती निर्मूलन, शैक्षणिक मार्गदर्शन व नागरिकांकरिता आरोग्य शिबिराचे मुरूमगाव येथे आयोजन करण्यात आले.

 

आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

 

आरोग्य शिबिरात तोंडाचा कॅन्सर, स्तन कॅन्सर, नेत्र रोग, हदयरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग अशा विविध रोगावर उपचार करून त्यांना गोळ्या व औषधांचे वाटप करण्यातत आले.

यावेळी1748 रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या पैकी 598 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.68 लोकांना पुढील उपचारासाठी यावेळी नोंद करण्यात आली सर्व रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून मेडिट्रिना हॉस्पिटल नागपूर येथे मोफत उपचार करण्यात येणार आहे.

 

डॉ.कन्ना मडावी यांनी आरोग्याबदल समस्या जाणून घेतल्या.

 

डॉ.आशिष कोरेटि यांना गोंडि भाषेतून जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतले.

 

जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. प्रमोद खंडाते यांनी एक दिवस समाजासाठी या उपक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती जनजागृती व शैक्षणिक, आरोग्य विषयक केला मार्गदर्शन

 

आरोग्य शिबिरा निमित्त नागरिकांना व रुग्णांना तंबाखूचा नायटा करा जीवन निर्व्यसनी बनवा, जीवनाचे सार तंबाखू पुढे हार तसेच दारू,गांजा, चरस, तंबाखू ,गुटखा ,यांच्या आहारी गेलेल्या नागरिकांना तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर ,फुफ्फुसाचा कॅन्सर,दाढेचा कॅन्सर तसेच तोंडाचा वास येणे ,दम लागणे ,आणि हदय विकाराचा झटका येऊ शकतो,सिगारेट मध्ये तसेच तंबाखू मध्ये 400 रसायने असतात त्यापैकी कमीत कमी 43 रसायने कॅन्सरला कारणीभूत ठरतात तंबाखूमध्ये निकोटिन नावाचा घातक विषारी पदार्थ असतो.तंबाखू सेवनामुळे कॅन्सरचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे , महिला, पुरुष व विद्यार्थी व्यसन सोडून आपला जीवन रोगमुक्त बनवावं

 

पुढे शैक्षणिक विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना

अतिदुर्गम भागातील समाजबांधवांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांना उत्तम शिक्षण द्यावे, शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे, शिक्षणाचा उपयोग करून आपण आयुष्यात खूप काही मिळू शकतो , शिक्षणाचा स्तर लोकांच्या सामाजिक कौटुंबिक आदर वाढवतो व स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते, कौशल्य विकसित करण्यास मदत करते, , चांगले व्यैक्तिमत्त्व तसेच वैयक्तिक जीवनात समस्यांच्या सामना करावा लागतो अशा परिस्थितीत माहिती पूर्ण निर्णय घेण्याची क्षमता शिक्षणातून मिळते शिक्षण माणसाला ज्ञान मिळवण्यास आणि जीवनात आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते, शिक्षण हे सुशिक्षित व्यैक्तीचा समाजाचा उत्तम, नागरिक बनवू शकतो

, शिक्षण घेताना येत असलेल्या अडीअडचणी यावर केलेली मात व अभ्यासाची जिद्द व चिकाटी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . आपल्या मुलांना शिक्षणाकडे व अभ्यासाची जिद्द व चिकाटी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपल्या मुलांना शिक्षणाकडे जातीय लक्ष देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

 

डॉ.नरेश मडावी यांनी प्राचिन गोंड समाजाच्या इतिहासामध्ये गोंड कालिन साम्राज्य हाच खरा रामराज्य होता असे प्रतिपादन

.

रविंद्र होळी यांनी समाजाचा विकास साधतांना आपले वैभवशाली परंपरा,देविदेवता ठाकूर देव यांचा अभ्यास करून त्या लेखणीबध्द करणे हि काळाची गरज आहे असे नमूद केले.

 

कार्यक्रमाचे उद्घाटक श्री अमर शहा मडावी अध्यक्ष टिपागढ यांनी आपला क्षेत्र फक्त कृषी क्षेत्र असून पारंपारिक शेती व ,काळानुरूप होत असलेला बदल लक्षात घेता शासकीय योजना व आधुनिक शेतीच्या आधारे उत्पन्न वाढविने आपल्या मुलांना शिक्षणाकडे जातीय लक्ष देऊन त्यांच्या सर्वांगीक विकासाकरिता प्रयत्न करावे.

 

डॉ., सचिन मडावी समाज कल्याण आयुक्त गडचिरोली श्रीमती प्रियंका मडावी स्त्रीरोग तज्ञ यांच्या तर्फे समाज बांधवांना 100 , ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री भूपेंद्रशहा मडावी,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमरशहा मडावी, समाज प्रबोधन करिता प्रमुख श्री नरेश मडावी, ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेश नैताम ,खलीकर्मा अधिकारी यांनी केले. ,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागेश टेकाम यांनी केले. श्री नारायण वट्टी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी,डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली.

डॉ. बागराज दुर्वे, डॉ. आशिष कोरेटि, डॉ. श्री रविंद्र होळी, राजेश नैताम, श्री अजमन रावटे, श्री गवरना,श्री आदित्य श्री गितेश कुळमेथे आदि हजारोच्या संख्येने गावकरी उपस्थित होते.