अवघा रंग एक झाला ; दिवाळीनिमित्त भेंडाळा येथे रंगली रांगोळी स्पर्धा
(भव्य ऑनलाईन रांगोळी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद.)
भेंडाळा:- कोणी साक्षात राम सीता आपल्या रांगोळीतून साकारले, तर कोणी बेटी पढाव, छत्रपती शिवाजी महाराज,
काढून या अभिनव उपक्रमात भाग घेतला.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता दिनांक :-१२/११/२०२३ ला आयोजित केली होती.या रांगोळी स्पर्धा मध्ये महिला तसेच युतीनी तासन तास आपल्या कलेच्या माध्यमातून आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या . तसेच जनजागृतीचे संदेश देणारे विविध रांगोळी काढण्यात आल्या . यावेळी ५५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.व बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक १४/११/२०२३ ला बक्षीस सोहळा नवयुवक मंडळ भेंडाळा येथे संपन्न झाला.अठरा वर्षावरील गट (अ)प्रीती स्वप्नील मंडल प्रथम,भावना विठोबा चलाख द्वितीय, स्नेहल रमेश कोकावार तृतीय,*अठरा वर्षाखालील गट (क) तनु नरेश डोहने प्रथम, जानवी संतोष सातपुते द्वितीय,स्वरा अतिश वैरागडे , प्रमुख पाहुणे – राहुल वैरागडे, राकेश सातपुते, निखिल वैरागडे, राकेश धोटे, शुभम चातले, डॉ.अमित आभारे, सौरभ वासेकर, अजय वाकुडकर, चेतन कोकावार,आशा वर्कर पोरेड्डीवार संपूर्ण गावकरी उपस्थित होते,जमलेल्या उपस्थितानी यावेळी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.



