अप्पर पोलीस महासंचालक  यांच्या उपस्थितीत पार पडला एटापल्ली येथील “उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व क्यु.आर.टी. बॅरेक नूतनीकरण उद्घाटन समारंभ

62

अप्पर पोलीस महासंचालक  यांच्या उपस्थितीत पार पडला एटापल्ली येथील “उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व क्यु.आर.टी. बॅरेक नूतनीकरण उद्घाटन समारंभ”

 

* जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांना विविध साहित्यांचे वाटप.

 

 

 

 

गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिन जिल्हा असून येथील आदीवासी भागात राहणा­या नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने आज दिनांक 23/11/2023 रोजी मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) म. रा. मुंबई श्री. प्रविण साळुंके सा. यांच्या हस्ते व गडचिरोली परिक्षेत्राचे मा. पोलीस उपमहानिरीक्षक श्री. संदिप पाटील सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत एटापल्ली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व क्यु.आर.टी. बॅरेक नूतनीकरण उदघाटन समारंभ व गडचिरोली पोलीस दलाच्या “पोलीस दादालोरा खिडकी ”चे माध्यमातुन जनजागरण मेळावा पार पडला.

 

यावेळी आयोजीत जनजागरण मेळाव्यास एटापल्ली गाव परिसरातील 300 ते 400 च्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच सदर जनजागरण मेळाव्यास उपस्थित नागरिकांना धोतर, साड्या, ब्लॅकेट व इतर जिवनावश्यक भेटवस्तू व साहीत्यांचे वाटप केले. तसेच शालेय विद्याथ्र्यांना नोटबुक, कंपास बॉक्स, बिस्कीट पॉकेट, चॉकलेट्स, व्हॉलीबॉल नेट व बॉल, क्रिकेट साहित्य इत्यादी साहीत्यांचे वाटप करुन मा. अपर पोलीस महासंचालक सा. यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या मागील कामगिरीचा आढावा घेवुन, उत्कृष्ट कामगिरीबाबत शुभेच्छा दिल्या व उपस्थित नागरिकांना संबोधीत करतांना त्यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबध्द असुन, येथील सामान्य जनतेने सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत आश्वासित केले तसेच जनतेनी माओवाद्यांच्या भुलथापांना बळी पडु नये व दुर्गम भागात काम करणा­या अधिकारी/अंमलदार यांनी आणखी उत्कृष्ठ काम करावे, तसेच पोलीस आणि नागरिक यांनी एकजूट होऊन या भागाचा विकास केला पाहीजे असे सांगितले.

 

सदर कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय राखीव पोलीस बलाचे मा. पोलीस महानिरीक्षक श्री. पी. एस. रनपिसे सा., गडचिरोली परिक्षेत्राचे मा. पोलीस उपमहानिरीक्षक श्री. संदिप पाटील सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली श्री. सुदर्शन राठोड हे उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली श्री. सुदर्शन राठोड तसेच पोस्टे एटापल्लीचे प्रभारी अधिकारी श्री. नीलकंठ कुकडे व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.