आज दिनांक २४/११/२०२३ रोजी सकाळी टिटोला गावात (एओपी गट्टा जांभीयापासून 7 किमी पूर्वेकडे) माओवाद्यांनी एका नागरिकाची हत्या केल्याची नोंद झाली आहे .लालसू धिंग्रा वेल्डा, वय 55, रा/टिटोला यास काल रात्री माओवाद्यांनी ठार मारले असून तो टिटोला गावचा पोलीस पाटील देखील होता आणि त्याने स्थानिक गावकऱ्यांना खाणकामाच्या ठिकाणी रोजगार मिळवून दिला होता आणि पोलिसांचा एजंट होता या कारणावरून माओवाद्यांनी त्याची हत्या केली होती. याप्रकरणी पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.
एकाच गावातील 10-12 जणांचे माओवाद्यांनी अपहरण केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. गडचिरोली पोलीस हे स्पष्ट करू इच्छितात की आज या गावात खुनाच्या घटनेशिवाय अशी कोणतीही घटना घडलेली नाही.



