*सल्ला गांगरा शक्ती स्थापना कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांची उपस्थिती*

219

*सल्ला गांगरा शक्ती स्थापना कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांची उपस्थिती*

 

*समाज बांधवांनी केले ताईंचे जंगी स्वागत*

 

अहेरी:तालुक्यातील शिवाणीपाठ येथील सल्ला गांगरा शक्ती स्थापना व विविध कार्यक्रमात माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

 

शिवाणीपाठ येथे आदिवासी बांधवांतर्फे सल्ला गांगरा शक्ती स्थापना,सप्तरंगी ध्वजारोहण तथा सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम व सामाजिक,सांस्कृतिक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ठरलेल्या वेळेनुसार धार्मिक विधी व मठ पूजा,सप्तरंगी ध्वजारोहण,सामूहिक विवाह सोहळा तसेच गोंडी सांस्कृतिक नृत्य व गोंडी कलाकारांचा सत्कार व प्रबोधन कार्यक्रम आदी कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमांत उशिरा का होईना समाजाचा कार्यक्रम असल्याने ताईंनी उपस्थिती दर्शवून आदिवासी बंधू,बघिणींना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

 

तत्पूर्वी कार्यक्रम स्थळी आगमन होताच आयोजकांनी ताईंचे जंगी स्वागत केले.यावेळी समाज बांधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.