ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

238

ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

 

अहेरी;

तालुक्यातही चिचगुंडी गुंफा येथील दोन तरुण अहेरीवरून एटापल्लीकडे जातांना एलचिल गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत सचिन पद्माकर नागुलवार (२३) जागीच ठार तर शंकर रमेश येडगम, (३१) गंभीर जखमी झाला आहे.

शंकर येडगम याला प्रथम उपजिल्हा रुग्णालयात अहेरी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.