अहेरी येथे सचिनचे मृतदेह घेऊन मध्यरात्री कुटूंबियांनी केले ठिय्या आंदोलन, सुरजागड कंपनीने सर्व मागण्या केले मान्य..!!
अहेरीतील युवक सचिन नागुलवार यांचा काल सुरजागड ट्रकचा भीषण अपघातात एटापल्ली मार्गावरील येलचील येथे जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर एक युवक गँबिर जखमी झाला होता, विविध मागण्यांसाठी नागुलवार कुटूंबियांनी मृतदेह घेऊन अहेरीतील आजाद चौकात काल मध्यरात्री ठिय्या आंदोलन केले होते, जनतेनीही इतक्या रात्री मोठ्या संख्येने उपस्थित राहून समर्थन दिले, लाईड्स मेटल्स तथा त्रिवेणी कंपनी विरुद्ध प्रचंड जणआक्रोश होता, त्यांचा कुटुंबियांचा विनंतीनुसार आज अहेरीतील सर्व दुकाने सकाळ पासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आले होते, शेवटी कंपनीला ह्या दबावाखाली झुकावे लागले असून सचिनचा कुटुंबाला ५ लक्ष रुपये तर एका गँबिर जखमींला १ लक्ष रुपये तथा त्यांचा रुग्णालयाचा पूर्ण खर्च तसेच २ लोकांना कंपनीत नौकरी देण्याचे कंपनीने मान्य केले आहे, सर्व मागण्या मान्य झाले असल्याने शेवटी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याला कुटुंबियांनी आज होकार दिला तसेच संध्याकाळी मृतक सचिनचे अंत्यविधी होणार आहे..!!



