*मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे नगराध्यक्ष दिपयंती पेंदाम यांचा हस्ते शुभारंभ*

127

*मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे नगराध्यक्ष दिपयंती पेंदाम यांचा हस्ते शुभारंभ*

 

आज दिनांक २९/११/२०२३ रोज बुधवारला नगरपंचायत कार्यालय एटापल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे शुभारंभ नगराध्यक्ष दिपयंती पेंदाम यांचा हस्ते झाले.सदर अभियाना अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड, नवीन मतदान कार्ड,संजय गांधी निराधार योजना असे अनेक योजनेचे लाभ नगरपंचायत एटापल्ली तर्फे मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत तसेच सदर अभियान ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राहील व नगरपंचायत क्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आव्हान नगरपंचायत एटापल्ली तर्फे करण्यात आले.याप्रसंगी राघव सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली, कविता रावलकर महिला व बालकल्याण सभापती नगरपंचायत एटापल्ली, निजान पेंदाम नगरसेवक न.पं.एटापल्ली, राहुल कुळमेथे नगरसेवक न.पं.एटापल्ली, जितेंद्र टिकले नगरसेवक न.पं.एटापल्ली,निर्मला कोंडबतुलवार नगरसेविका न.पं. एटापल्ली,बिरजू तिम्मा नगरसेवक न.पं.एटापल्ली,जाणोबाई गावडे नगरसेविका न.पं.एटापल्ली,नामदेव हिचामी नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली,संपत पैडाकुलवार तसेच लाभार्थी उपस्तीत होते.

 

 

एटापल्ली नगरपंचायत क्षेत्राचा सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सशक्तीकरण करणे ही मूलभूत व आवश्यक बाब आहे.महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहे.महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी एकत्रितरित्या विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. तसेच “महिला सक्षमीकरण” प्रक्रिया लोकाभिमुख करून त्यास लोकसहभागाची जोड देण्याची देखील आवश्यकता आहे.त्यानुसार महिलांना संघटित करणे, त्यांना प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलांच्या संदर्भात राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करणे, महिलांशी संबंधित योजना राबविणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे या उद्देशाने नगरपंचायत एटापल्ली मध्ये “मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान” राबविण्यास सुरुवात केलेले आहे- राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली