*व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते बक्षीस वितरण*

148

*व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते बक्षीस वितरण*

 

*मंडळातर्फे भाग्यश्री ताईंचे जंगी स्वागत*

 

*अहेरी:-* तालुक्यातील दिनाचेरपल्ली येथे आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

 

दिनाचेरपल्ली येथील जयासेवा क्लब तर्फे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.नुकतेच याठिकाणी आंबटपल्ली आणि चेरपल्ली या दोन संघात अंतिम सामना संपन्न झाला.यात आंबटपल्ली संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले, चेरपल्ली संघाने द्वितीय, तर धनुर संघाला तृतीय पारितोषिक पटकाविले.

 

तिन्ही संघांना माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले.यावेळी सरपंच रेणुका आत्राम, रतन दुर्गे,नागेश करमे,नागेश मडावी आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

दरम्यान गावात आगमन होताच मंडळातर्फे भाग्यश्री ताई आत्राम यांचे भव्य स्वागत करण्यात आले.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक भाग्यश्री ताई आत्राम यांचे कडून 25 हजार,द्वितीय पारितोषिक रेणुका आत्राम यांचेकडून 15 हजार तर,तृतीय पारितोषिक नागेश करमे यांचेकडून 10 हजार रुपये देण्यात आले.