*नगरपंचायत एटापल्ली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन*

131

*नगरपंचायत एटापल्ली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन*

 

दिनांक ३०/११/२०२३ रोजी नगरपंचायत एटापल्लीच्या विविध प्रभागात विकासकामांचे नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम यांचा हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला तसेच प्रभाग निहाय नगरोत्थान महाअभियान योजना सण-२०२२-२३ अंतर्गत सौर ऊर्जेवर चालनारे स्ट्रीट लाईट, प्रभाग क्रमांक ०५ येथे पालीबाई गोटा यांचा घरासमोर सौर ऊर्जेवर चालनारे दुहेरी हातपंप, प्र.क्र.०२ येथे महिला ग्राम संघ गोडावून जवळ सौर ऊर्जेवर चालनारे दुहेरी हातपंप, प्र.क्र.१४ येथे भगवान करमरकर यांचा घराबाजूला सौर ऊर्जेवर चालनारे दुहेरी हातपंप, प्र.क्र.१७ वासामुंडी मेसो नरोटी यांचा घराजवळ सौर ऊर्जेवर चालनारे दुहेरी हातपंप, प्र.क्र. ०४ एस.डी.पि.ओ कार्यालय ते कालीमाता मंदिर पर्यंत नाली बांधकाम व नागरी दलीतेत्तर वस्ती सुधार योजना सण २०२२-२३ अंतर्गत प्रभाग क्रमांक १४ येथे नारायण गावडे ते अशोक खोब्रागडे यांचा घरापर्यंत नाली बांधकाम, प्रभाग क्रमांक ०७ येथे गुरुदास बारसागडे ते विस्तारी गावतुरे यांचा घरापर्यंत सि.सि.रोड बांधकाम, प्रभाग क्रमांक १२ येथे नसरू शेख ते कंपेलवार यांचा घरापर्यंत सि.सि.रोड व नालीवर कव्हर बांधकाम, प्रभाग क्रमांक १२ येथे कन्यका मंदिर समोर सि.सि.रोड व कन्यका मंदिर ते रफिक शेख यांचा घरापर्यंत नाली बांधकाम, प्रभाग क्रमांक १२ येथे बि.एस.एन.एल ऑफिस ते विनोद भांडेकर यांचा घरापर्यंत सि.सि.रोड बांधकाम तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना सन २०२२-२३ अंतर्गत प्रभाग क्रमांक ०३ जिवनगट्ट येथे चंदू आलामी ते अशोक भसारकर यांचा घरापर्यंत पाईप ड्रेन बांधकाम, प्रभाग क्रमांक १० येथे लक्ष्मीबाई चिलवेलवार ते राजगोपाल सुल्वावार यांचा घरापर्यंत पाईप ड्रेन बांधकाम, प्रभाग क्रमांक १० येथे सचिन गेडाम ते अन्नपूर्णा मोहूर्ले यांचा घरापर्यंत पाईप ड्रेन बांधकाम, प्रभाग क्रमांक १० येथे प्रफुल कंदीकुरवार ते शदुल्ला शेख यांचा घरापर्यंत सि.सि.रोड व पाईप ड्रेन बांधकाम करणे असे एकूण २ कोटी २३ लक्षांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले अशी माहिती राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती यांनी दिली.याप्रसंगी दिपयंती पेंदाम नगराध्यक्ष न.पं. एटापल्ली, प्रविण चौधरी मुख्याधिकारी न.पं. एटापल्ली, राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती न.पं.एटापल्ली, कविता रावलकर महिला व बालकल्याण सभापती न.पं. एटापल्ली, निजान पेंदाम नगरसेवक न.पं. एटापल्ली,राहुल कुळमेथे नगरसेवक न.पं. एटापल्ली, जितेंद्र टिकले नगरसेवक न.पं. एटापल्ली व स्थापत्य अभियंता सौरभ नंदनवार, विवेक साखरे उपस्तीत होते.