जागतिक दिव्यांग दिन समता दिन म्हणून गट साधन केंद्र एटापल्ली येथे साजरा

128

जागतिक दिव्यांग दिन समता दिन म्हणून गट साधन केंद्र एटापल्ली येथे साजरा

 

एटापल्ली : वृत्तवाणी न्यूज

 

आज दि.03 डिसेंबर 2023 रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून गट साधन केंद्र एटापल्ली येथून एटापल्ली नगरीत जनजागृती रॅली काढण्यात आली.

जागतिक दिव्यांग दिनाची रॅलीचा कार्यालयीन कर्मचारी श्री.भांडारकर, श्री. खोब्रागडे, श्री.उत्तरवार , श्री.दिलीप पुंगाटी , श्री.आनंद जिकार व केजीबीव्ही , जिप हायस्कूल एटापल्ली, समुह निवासी एटापल्ली येथील सर्व शिक्षकवृंद यांचे प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. घोषवाक्य देत संपूर्ण शहरात फेरी काढून विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक दिव्यांग दिन समता दिनाची महती सांगण्यात आली. जागतिक दिव्यांग सप्ताहातील नियोजनानुसार विविध कार्यक्रम राबण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित सर्व बालकांना खाऊचे वितरण करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी , शिक्षकवृंद व पालकवर्ग यांनी सहकार्य केले.