गुंडापुरीत “गुंडाराज”आजी आजोबा व नातीची गळा चिरून हत्या,
एटापल्ली; तालुक्यातील बुर्गी पोलीस मदत केंद्र हद्दीतील भामरागड तालुक्याच्या गुंडापुरी गावातील आजोबा देऊ दसरू कुमोटी (६०), आजी बिच्चे देऊ कुमोटी (५५) व नात अर्चना रमेश तलांडी (१०) या तिघांनी त्यांच्याच शेतात अज्ञातांनी हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या धान कापनी व मळणीचा हंगाम सुरू असून आजोबा, आजी व नात आपल्या शेतातील झोपडीत राहून धान कंपनीची कामे करीत होते, सदरच्या हत्या नरबळी अथवा आपसी वादातून झाल्या असल्याचा अंदाज नागरिकांमधून वर्तविण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास बुर्गी पोलिसांकडून केला जात आहे. असे कळते




