*अहेरी तालुक्यातील बोरी येथील भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन*

119

*अहेरी तालुक्यातील बोरी येथील भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन*

 

 

*श्री वर्धराज स्वामी मंडळा कडून भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन*

 

*◆अहेरी◆* :तालुक्यातील बोरी येथे श्री वर्धराज स्वामी मंडळाकडून आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

 

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून बोरी उपसरपंच पराग ओल्लालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून आविस सल्लागार तथा राजपुर पॅच माजी सरपंच रामलू कुडमेथे,शांतिग्राम उपसरपंच श्रीकांत समतदार,कमल बाला,लिंगाजी दुर्गे,जंपलवार काका,साई मडावी,साईनाथ गड्डमवार,पत्रकार अखिल कोलपाकवार, दौलत मडावी,रमेश आलाम,पुल्लीवर जी,ठवरे मॅडम,अंकित दुर्गे,संजय तलांडे,विनोद कावेरी,जुलेख शेख सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी व्हॉलीबॉल खेळाविषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

 

व्हॉलीबॉल सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.

 

श्री वर्धराज स्वामी मंडळा कडून आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंकित दुर्गे यांनी मानले.या व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला बोरी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी प्रेमसागर आत्राम,मनोज आलाम,प्रवीण सोयाम,लवकुश आत्राम,अक्षय मडावी,अंकित दुर्गे,संजय तलांडे यांनी परिश्रम घेतले.