विजुक्ताचीअहेरी तालुका कार्यकारिणी गठित

63

विजुक्ताचीअहेरी तालुका कार्यकारिणी गठित

अहेरी

आज दि ८/१२/२३ रोज शुक्रवारला अहेरी तालुका विजुक्ता कार्यकारिणी गठित करण्यासाठी अहेरीत सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा विजय गोहोकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष प्रा उत्तम मूंगमोडे व जिल्हा संगठन सचिव प्रा सुनील खंडाळे हे उपस्थित होते . सदर सभेमध्ये तालुका कार्यकारिणीची बिनविरोध व सर्वसंमतीने निवड करण्यात आली तालुकाध्यक्ष म्हणून प्रा विजय उरकुडे ,उपाध्यक्ष प्रा गणेश आत्राम ,सचिव प्रा रुपेश सुनतकर , सहसचिव प्रा कु एम बी गावंडे , संगठन सचिव प्रा तानाजी ढोंगळे, प्रसिद्धी प्रमुख प्रा विलास पिंपळकर , कोशाध्यक्ष प्रा एच के राजुरकर तसेच सदस्य म्हणून प्रा श्रीराम डुकरे , प्रा मदन शिरभये , प्रा उदय सरमुकदम , प्रा जी पी बारसे , प्रा किशोर दरवडे , प्रा कोमल चौधरी , प्रा सुहास मेश्राम , प्रा कु अर्चना घसगंतीवार , प्रा कु सोनाली गप्पावार , प्रा कु राणी कुमरे यांची निवड करण्यात आली .