*दिव्यागांसाठी आहेरीत भरला वधु-वर परिचय मेळावा*
*भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले उदघाटन*
अहेरी: वधु-वर परिचय मेळावा हे आपण नेहमीच ऐकले असेल. मात्र, आहेत नगरीत एका आगळा-वेगळा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा वधू-वर परिचय मेळावा तुमच्या- आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी नव्हता तर हा होता दिव्यांग बांधवांसाठी. आस्था बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट,वरोरा द्वारा संचालित स्व.गौरव बाबू पुगलिया दिव्यांग उपवर-वधू सूचक केंद्र वरोरा, दिव्यांगन एकता संघटना अहेरी तर्फे १० डिसेंबर रोजी वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या वधू-वर परिचय मेळाव्याचे उदघाटन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अमोल मुक्कावार,प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष धार्मिक भगत,भोयर व राकेश कारेंगुलवार तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपवर-वधू परिचय मेळाव्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांग मुलं-मुलींनी परिचय दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या रेशीमगाठी जुळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.सर्वसामान्य व्यक्ती त्याचा साथीदार शोधण्यासाठी दूरवर जाऊ शकतो, समाजातील इतर लोकही त्यांना साथीदार मिळवून देण्यासाठी मदत करतात. मात्र, आमच्यासारख्या उपेक्षित दिव्यांगांना त्यांचा साथीदार शोधण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे अशा आयोजनाची नितांत गरज असल्याचे मत दिव्यांग मुलं-मुलींनी व्यक्त केला.
*माता कन्यका परमेश्वरी मंदिरात आयोजन*
आस्था बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट ही संघटना दरवर्षी दिव्यांगांसाठी वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करते. या वर्षी माता कन्यका परमेश्वरी देवस्थान,अहेरी येथे या वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते.या परिचय मेळाव्यातून लग्नगाठ जुळत असल्याने दिव्यांग मुलं-मुली मोठ्या संख्येने या मेळाव्यात उपस्थित होते.




