निवासी दिव्यांग विद्यालय लांझेडा, गडचिरोली येथे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयतर्फे अन्नदान

75

 

निवासी दिव्यांग विद्यालय लांझेडा, गडचिरोली येथे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयतर्फे अन्नदान

 

गडचिरोली दि. ९ डिसेंबर २०२३

गडचिरोली येथील प्रगती बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित निवासी दिव्यांग विद्यालय लांझेडा, गडचिरोली येथे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासाच्या वतीने दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी अन्नदान करण्यात आले. यावेळी निवासी दिव्यांग विद्यालयाचे , वॉर्डन श्री भास्कर दोनाडकर व सौ. सुनिता रामपूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे विविध समाजोपयोगी व विविध समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

न्यासातर्फे गरजूना कपडे वाटप, खाऊवाटप, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे ,ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, आरोग्यविषयक तपासणी असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून या अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यासाच्या वतीने श्रीमती मीना अलगमवार, सौ. भाग्यश्री अलगमवार सहभागी झाल्या होत्या . या कार्यक्रमाचा लाभ १६ विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना आनंद झाला असे मत विद्यालयाचे वॉर्डन श्री. दोनाडकर यांनी व्यक्त केले.