- राज्यव्यापी संपा अंतर्गत अंगणवाडी महिलांचे सीटुच्या नेतृत्वात अहेरीत भव्य मोर्चा व सभा
किमान वेतन ,ग्रेज्युटि व पेन्शन मिळविन्यासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर पासून सीटु च्या नेतृत्वात राज्य व्यापी संप पुकारलेले आहे. या संपा अंतर्गत हजोरो अंगणवाडीना टाळे लावुन महिला आंदोलन करीत आहेत.
याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज दिनांक 20 डिसेंबर ला अहेरी,मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील सर्व प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी अहेरी तहसील कार्यालय पासुन रैली काढुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला व सरकारच्या विरोधात नारे देऊन निवेदन दिले
या मोर्चात अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी भेट देऊन मोर्चाला पाठिंबा दिला व संबोधन केले .उपविभागीय अधिकारी श्री. वाघमारे साहेबांनी स्वता मोर्चा स्थळी येऊन मागण्याचे निवेदन स्विकारले.
या मोर्चाचे नेतृत्व कॉ.रमेशचंद्र दहिवडे,कॉ.राजेश पिंजरकर कॉ.किशोर जामदार, कॉ.अमोल मारकवार, कॉ.अरुण भेलके यांनी केले.या मोर्चात मायाताई नवनुरवार,विठाबाई भट,छाया कागदेलवार,सुनंदा बावने, मोनी विश्वास, मुन्नी शेख,संगिता वडलाकोंडावार,वच्छला तलांडे ,जयश्री शेरेकर,सुमनताई तोकलवार,मंगला दुग्गा,निर्मला नलगुडावार,कल्पना कुमरे ईत्यादी अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाले होते.




