_*वानेरी येथे रंगला डे-नाईट कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम*_
_*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*_
ब्रम्हपुरी/प्रतिनिधी
_सिंदेवाही तालुक्यातील वानेरी येथे श्री शिवछञपती क्रिडा मंडळ, वानेरी यांच्या सौजन्याने कबड्डीप्रेमिंसाठी भव्य रणसंग्राम कबड्डीचा वानेरी या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून *या कबड्डी स्पर्धेचा कार्यक्रमाचे उद्घाटक लोकमत चंद्रपूर जिल्हा भुषण पुरस्कार प्राप्त माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडला.*_
_कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युनूसभाऊ शेख नगरसेवक न.प. सिंदेवाही उपस्थित होते. सहउद्घाटक म्हणून स्वप्नीलभाऊ कावळे नगराध्यक्ष न.प. सिंदेवाही उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून महेशभाऊ मंडलवार अध्यक्ष वी.भ.ज.सेल काँग्रेस कमिटी सिंदेवाही, देवाभाऊ मंडलवार भाजपा युवा मोर्चा सिंदेवाही, उमेश धोटे सरपंच चौगान, वेलोडकर सर तर प्रमुख अतिथी म्हणून उषाताई नेवारे सरपंच वानेरी, महादेव खोब्रागडे ग्रा.पं.सदस्य वानेरी, शंकर ठाकरे अध्यक्ष तं.मु.स.वानेरी, साधना परचाके ग्रा.पं.सदस्य वानेरी, शारदा अगळे पो.पा.वानेरी, सुरेश जीवतोड, दुर्वास मंडलवार ग्रा.पं.सदस्य, आराभाऊ मुखिडवार लता मसराम आशा वर्कर, राणी कामडी व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते._
_या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असलेला हा खेळ, या खेळाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. ही परंपरा कायमस्वरूपी पुढे चालू ठेवावी. वानेरी मधे कबड्डी स्पर्धा भरवल्याने मनापासून आनंद झाला आहे. तरुणांची खेळाप्रती रुची वाढवणे आणि त्यांना अधिक प्रतिभावान बनवणे हा अश्या स्पर्धांचा मुख्य उद्देश असला पाहिजेत. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली._
_या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघास विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून 15 हजार रोख आहे. द्वितीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्याकडून 10 हजार रुपये रोख, तृतीय पारितोषिक इंदिरा गांधी विद्यालय टेकरीचे मुख्याध्यापक लोमेश अगडे यांच्याकडून 7 हजार रुपये रोख, चतुर्थ पारितोषिक वि.भ.ज.सेल काँग्रेस कमिटी सिंदेवाहीचे अध्यक्ष महेशभाऊ मंडलवार यांच्याकडून 5 हजार रुपये रोख देण्यात येईल. सोबतच बेस्ट ऑल राऊंडर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट रेडर, कॅप्टन कूल असे अनेक पुरस्कार देण्यात येणार आहेत._




