*२२ जानेवारी ला प्रभू श्रीरामचंद्र यांची मूर्ती देवघरात ठेवून पूजन करा*

69

*२२ जानेवारी ला प्रभू श्रीरामचंद्र यांची मूर्ती देवघरात ठेवून पूजन करा*

 

*आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या वतीने प्रभू श्रीरामाच्या पंचधातूच्या मूर्तींचे वितरण*

 

*जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व बूथ वॉरियर्स दिली मूर्ती भेट*

 

*दिनांक ७ जानेवारी गडचिरोली*

 

*आपले आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापणा २२ जानेवारीला अयोध्येमधील नवनिर्माणाधीन भव्य मंदिरात होत असून त्याच दिवशी आपल्याही घरातील मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीचे पूजन करावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले असून त्यासाठी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी अयोध्येवरून आणलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या पंचधातूच्या मूर्तीचे वितरण भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.*

 

*यावेळी त्यांनी भाजपा जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतजी वाघरे,ज्येष्ठ नेते लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे , लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेशजी भुरसे,भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे तालुकाध्यक्ष विलासजी भांडेकर महामंत्री बंडूभाऊ झाडे विधानसभा विस्तार दामोदर जी अरिगेला यांचे सह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बुथ पालक या सर्वांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या पंचधातूची मूर्ती भेट दिली.*