15 जानेवारी ला मकरसंक्रांती निमित्त स्थानिक सुट्टी जाहिर करा-          महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन

62

15 जानेवारी ला मकरसंक्रांती निमित्त स्थानिक सुट्टी जाहिर करा-

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन

गडचिरोली:जि. प्र.

यावर्षी 2024-2025 च्या स्थानिक सुटयांच्या नियोजना करिता बैठक आयोजित करण्यात आलेली नाही. दरवर्षी मकरसंक्रांत या सणानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येते.परंतु यावर्षी अजूनपर्यंत मकरसंक्रांतीची सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.दरवर्षी प्रमाणे महिला कर्मचारी व विद्यार्थिनींचा विचार करून सोमवार दिनांक 15 जानेवारीला मकरसंक्रांत सणांची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात यावे.अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने कार्याध्यक्ष संतोष सुरावार यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदनाद्वारे केली.