*!! चामोर्शी शहरात भव्य रात्रकालिन नमो चषक प्रो, कबड्डी स्पर्धा, डिजेच्या तालावर,* *हायमास्टच्या लक्ख प्रकाशात,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील शेकडो कबड्डी पटुंचा घे पंगा,कर दंगा!!*

118

*!! चामोर्शी शहरात भव्य रात्रकालिन नमो चषक प्रो, कबड्डी स्पर्धा, डिजेच्या तालावर,* *हायमास्टच्या लक्ख प्रकाशात,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील शेकडो कबड्डी पटुंचा घे पंगा,कर दंगा!!*

*!!गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रातील विजयी कबड्डी चमू व स्थानिक चमूचा सहभाग!!*

*!!खासदार अशोक भाऊ नेते यांचा पुढाकार!!*

 

*दिनांक 14 जानेवारी 2024*

*गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांच्या पुढाकाराने*

*चामोर्शी येथील स्थानिक संताजी क्रीडांगण येथे जय बजरंग युवा मंडळ ( गोंडपुरा ) चामोर्शी जिल्हा गडचिरोली द्वारा* *आयोजित गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी शहरात प्रथमच गडचिरोली चिमूर* *लोकसभा क्षेत्रातील सर्वात मोठे नमो चषक प्रो, कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे*

*या स्पर्धेकरिता प्रवेश फी तीन हजार रुपये व आक्षेप फी सहा हजार रुपये ठेवण्यात आलेले आहे सदर स्पर्धेचे प्रथम बक्षीस एक लाख 11 हजार 111 रुपये व द्वितीय बक्षीस 99 हजार 999 रुपये ठेवण्यात आले आहे* *या आयोजित स्पर्धेत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली विधानसभा अहेरी विधानसभा बल्लारपूर विधानसभा ब्रह्मपुरी विधानसभा व आरमोरी* *विधानसभा चिमूर विधानसभा व आमगाव विधानसभा क्षेत्रातील कबड्डी स्पर्धेत विजय झालेले सर्व विजयी*

*चमु सहभाग घेणार आहे तसेच सदर स्पर्धा खुली असल्याने या स्पर्धेत प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील व विदर्भातील विविध जिल्ह्यातून पट्टीचे कबड्डीपटू सहभाग घेणार आहे सदर कबड्डी स्पर्धा रात्र कालीन असल्याने मैदानावर* *हायमास्ट लावण्याचे काम सुरू आहे तसेच सदर संपूर्ण स्पर्धा एलईडी स्क्रीनवर व व्हाट्सअप फेसबुक ट्विटर आणि टीव्ही चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे त्यामुळे चामुर्शी शहरात या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे* *या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जय बजरंग युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक आशिष भाऊ पिपरे यांनी सांगितले या स्पर्धेच्या निमित्ताने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील 5000 नव युवकांची नोंदणी करण्यात येणार आहे तसेच या स्पर्धेत* *लाखो रुपयाच्या प्रोत्साहन पर बक्षिसांची लय लूट केली जाणार आहे सदर स्पर्धेत विदर्भातील तमाम कबड्डीपटू यांनी सहर्ष सहभाग घ्यावा व ठेवण्यात आलेली बक्षिसे विजय मिळवून मान्यवरांच्या हस्ते प्राप्त करावे असे आवाहन केले*

*या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धेचे संयोजक खासदार अशोक भाऊ नेते यांचे चामोर्शी जनसंपर्क कार्यालय प्रमुख रमेश अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे सांगितले*