*_हळदी कुंकू म्हणजे हिंदू संस्कृतीतील स्त्रियांसाठी एक सौभाग्याचालेन या माध्यमातून स्त्रियांनी एकत्र यावं व एकजुटीने कार्य करावे…._*  *_खासदार अशोक नेते_*

62

*_हळदी कुंकू म्हणजे हिंदू संस्कृतीतील स्त्रियांसाठी एक सौभाग्याचालेन या माध्यमातून स्त्रियांनी एकत्र यावं व एकजुटीने कार्य करावे…._*

*_खासदार अशोक नेते_*

————————————-

*भारतीय जनता पार्टी, महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम व स्नेहा मिलन सोहळा नगर परिषद च्या डी. एस. आर. सांस्कृतिक भवन चंद्रपूर रोड गडचिरोली येथे आयोजित..*

————————————

(गडचिरोली)

दि.२१ जानेवारी २०२४

 

गडचिरोली:- आज दिंनाक २१ जानेवारी २०२४ रोज रविवारला मकरसंक्रांत च्या शुभमुहूर्तावर महिलांसाठी खास कार्यक्रम भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मिलन सोहळा नगरपरिषदेच्या डी.एस.आर संस्कृती भवन चंद्रपूर रोड, गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

 

हळदी कुंकू या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना मार्गदर्शन करतांना खासदार अशोक नेते म्हणाले की,महिलांना सामाजिक,आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे.केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33% करून महिलांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व पुरुषांना समान अधिकार तसेच महिलांसाठी व पुरुषांसाठी एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ घेता येईल म्हणून राज्य सरकारने महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम राबविलेला आहे.

महिलांनी घराबाहेर पडून घर कामासोबतच समाजकार्य राजकारणाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

 

याबरोबरचं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी महिलांसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. असे प्रतिपादन हळदी कुंकू व स्नेह मिलन या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

 

पुढे बोलतांना खासदार महोदयांनी हळदी कुंकू म्हणजे हिंदू संस्कृतीतील स्त्रियांसाठी एक सौभाग्याचालेन या माध्यमातून महिलांनी आपल्यासोबत कुटुंबाचा विकास साधावे. महिलांनी कसलाही भेदभाव न ठेवता स्वताला प्रगत करावे स्त्रियांनी एकमेकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.

यासाठी हळदी-कुंकु कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकजुट व्हावे.असे व्यक्तव्य यावेळी खा.नेते यांनी केले.

 

यावेळी सीमा कऩ्नमवार यांच्या ग्रुपने जन्मबाईचा बाईचा.. खूप घाईचा अतिशय सुंदर उत्तम डान्स प्रदर्शन केले.

 

याप्रसंगी खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला.

 

या कार्यक्रमाचे आयोजक व प्रास्ताविक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गिताताई हिंगे, सुत्रसंचालन जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, आभारप्रदर्शन महिला तालुकाध्यक्ष अर्चना बोरकुटे,यांनी केले.

 

 

यावेळी प्रामुख्याने मंचावर खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस,जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे, भाजपा जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे,जिल्हा सचिव रंजिता कोडाप, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी,तालुकाध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,तालुकाध्यक्ष लता पुन्घाटे,

शहराध्यक्षा कविता उरकुडे, जेष्ठ नेत्या वच्छलाबाई मुनंघाटे,रशमी बाणमारे, पल्लवी बारापात्रे, अर्चना निंबोड, निता बैस,भावना हजारे, सुंदराताई करकाडे,त्रिशा डोईजड, लता लाटकर,गिता उंदिरवाडे, अर्चना चन्नावार,

तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनीं उपस्थित होते.