*विद्यार्थी शिक्षणा सोबत क्रीडा क्षेत्रात आपलं नाव मोठं करून आपलं भविष्य उज्वल करू शकतो-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम.*

97

*विद्यार्थी शिक्षणा सोबत क्रीडा क्षेत्रात आपलं नाव मोठं करून आपलं भविष्य उज्वल करू शकतो-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम.*

 

*मन्नेराजाराम येथे पालक मेळावा तथा वार्षिक स्नेह संमेलन संपन्न..!*

 

*भामरागड* :-विद्यार्थी शिक्षणा सोबत क्रीडा क्षेत्रात आपलं नाव मोठं करून आपलं भविष्य उज्वल करू शकतो माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मन्नेराजाराम येथील राजे धर्मराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळेत पालक मेळावा तथा वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करत राजे साहेबांचे स्वागत केले.

 

पुढे बोलतांना ते म्हणाले पालकांनी मुलांना घरच्या कामात न लावता शाळेत पाठवलं पाहिजे.मुलं शाळेत येईल तेव्हाच ते आपलं भविष्य घडवेल आणि स्वतःच नाव व गावाचं नाव मोठं करू शकेल.विद्यार्थ्यांना तसेच पालकांना कोणतीही समस्या असतील तर मला भेटू शकता,मी सदैव तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहो.आपल्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं आणि त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी स्व.श्रीमंत राजे विश्र्वेश्वरराव महाराजांनी अतीदुर्गम भागात निवासी आश्रम शाळेची स्थापना केली आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

 

तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,गणवेश आणि क्रीडा साहित्य व बक्षीस यावेळी राजे साहेबांच्या हस्ते देण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते अवधेशराव आत्राम,सरपंच ग्रापंचायत मन्नेराजाराम कु.शारदाताई कोरेत,उपसरपंच कू.मनीषा मडावी,माजी जी.प.सदस्य.सौ. शारदाताई येगोलपवार,सामाजिक कार्यकर्ते सितारामजी मडावी जिंजगाव,माजी सरपंच पोच्याजी मडावी,पोलिस पाटील कृष्णा सिडाम,बाजीराव मडावी गोरणुर,मल्लेश मडावी पो.पा.गोरनुर, तसेच 20 ते 25 गावातील पालक वर्ग व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!