संतोष ताटीकोंडावार यांनी दिले वैभव वाघमारे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
अहेरी:-येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांचे वाशीम जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांची प्रकल्प कार्यालय येथे भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
उपविभागीय अधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून वैभव वाघमारे यांनी जवळपास 6 महिने कामकाज सांभाळली.या दरम्यान त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देत विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनते पर्यंत पोहोचविली.
अल्प कालावधीतच त्यांची नियुक्ती वाशीम जिल्ह्यात करण्यात आली असून आता त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण जिल्हा सांभाळायचा आहे.अहेरी सारख्या अतिदुर्गम भागात केलेल्या कामाचा अनुभव त्यांना वाशीम जिल्यात कामी येणार असून नक्कीच याही जिल्ह्यात ते उत्तम अशी कामगिरी करतील आणि जनतेचे प्रश्न सोडवतील असा आशावाद व्यक्त करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.