*गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेस स्थापना दिवस उत्साहात साजरा*
*जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*
गडचिरोली ::
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
कार्यक्रमाला संबोधित करताना महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी भूमिका बजावत आधुनिक भारताच्या निर्मितीचा पाया रोवण्याचे ऐतिहासिक कार्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केले आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांसाठी काँग्रेसने दिलेला संघर्ष आजही देशाला दिशा देणारा आहे.
प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम मिळावे, या उदात्त हेतूने काँग्रेस सरकारच्या काळात किमान शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली होती. त्यातूनच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अस्तित्वात आली. मात्र भाजप सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणामुळे केंद्र शासनाने या योजनेतील अनेक लोकहिताच्या तरतुदींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. हे निर्णय चुकीचे व निंदनीय असून, याच्या विरोधात आगामी काळात काँग्रेस पक्ष मोठे जनआंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक व शहर अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, नगरसेवक रमेश चौधरी, श्रीकांत देशमुख, पराग पोरेड्डीवार, नगरसेविका सौ. मेघाताई वरगंटिवार, नगरसेविका, सौ. मनीषाताई खेवले, माजी सभापती तथा माजी नगरसेवक विजय गोरडवार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजित कोवासे, सोशल मीडिया सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नंदुजी वाईलकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, सौ.पुष्पलताताई कुमरे, माजी नगरसेविका सौ. मीनलताई चिमुरकर, सौ. कविताताई उराडे, सौ. रिताताई गोवर्धन, सौ. शीतलताई ठवरे, सौ. विमलताई भोयर, सौ. वनिताताई काटेंगे, सौ. कल्पनाताई नंदेश्वर, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, जितेंद्र मूनघाटे, लालाजी सातपुते, प्रतिक बारसिंगे, मिलिंद बारसागडे, श्रीनिवास ताटपल्लीवार, उत्तम ठाकरे, समीर ताजने, अविनाश श्रीरामवार, आकाश मुलकलवार, जीवनदास मेश्राम, रघुनाथ दुधे, दिनेश सिडाम, अतुल नेचलवार, विजय राऊत, सुनिलकुमार चिमुरकर, मिथुन बाबनवाडे, निकेश कमीडवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





