*आवलमरी येथील व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण*

75

*आवलमरी येथील व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण*

 

अहेरी:-तालुक्यातील आवलमरी येथे आयोजित ग्रामीण व्हॅलीबॉल स्पर्धेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.

 

आवलमरी येथे 6 फेब्रुवारी पासून ग्रामीण व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडून 25 हजार रुपयांचा प्रथम पारितोषिक देण्यात आले होते.द्वितीय पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बाबा आत्राम यांच्याकडून 20 हजार रुपये तर तृतीय पारितोषिक मुसली तलांडी व वेंकटी पानेम यांच्याकडून 15 हजार रुपये देण्यात आले.

 

या स्पर्धेसाठी तेलंगाणा राज्यासह तब्बल 24 संघांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेचे प्रथम पारितोषिक तेलंगाणा संघाने,द्वितीय पारितोषिक आवलमरी तर तृतीय पारितोषिक गोलाकर्जी संघाने पटकाविले.विजेत्या संघांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी नागेश पेंदाम,किशोर करमे,मखमुर शेख,शैलेश गेडाम,ताजु कुळमेथे, नामदेव मडावी,मुसली तलांडी, राकेश डोंतुलवार,नागेश कुमराम आदी उपस्थित होते.