*शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न:मंत्री धर्मराव बाबा आत्राम*

53

*शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न:मंत्री धर्मराव बाबा आत्राम*

 

*एटापल्ली येथे महाआरोग्य शिबिराचे उदघाटन*

 

एटापल्ली:प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले रहावे आणि वेळेवर उपचार पोहोचावेत या उद्देशाने ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

 

एटापल्ली तालुका मुख्यालयात १६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासी भागातील रुग्णांना विशेष तज्ञांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाभव्य निशुल्क आरोग्य व दंत’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम, नगराध्यक्ष दिपयंती पेंदाम,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,माजी जि प सदस्य नाना नाकाडे,माजी प स सभापती बेबीताई नरोटे,तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम,संवर्ग विकास अधिकारी आदिनाथ आंधळे,बाल विकास अधिकारी विद्याधर बुरीवारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुपेश उईके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन कन्नाके आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे बोलताना दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विविध मोठे आजारावर उपचार घेण्यासाठी शहराच्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही.त्यामुळे या भागातील रुग्णांना विशेष तज्ज्ञांच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठीच महा आरोग्य निशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याठिकाणी विविध आजारावर उपचार केले जाणार असून नागरिकांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले.

 

या महाआरोग्य शिबिरात दंत चिकित्सा व उपचार, डोळ्याची तपासणी व मोतीबिंदूचे ऑपरेशन, कॅन्सर, मधुमेह,उच्च रक्तदाब व पक्षघात व इतर आजारांचे निदान व उपचार, स्त्रीरोग तपासणी, सोनोग्राफी व उपचार तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला.शिबिरात एटापल्ली तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.