*मांगली (अरब) येथिल भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेत मांगली (अरब) नवखळाचा संघ विजयी*

148

_*मांगली (अरब) येथिल भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेत मांगली (अरब) नवखळाचा संघ विजयी*_

 

_*बक्षीस वितरण समारंभाला माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांची विशेष उपस्थिती*_

 

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी

_नागभीड तालुक्यातील मांगली (अरब) येथे जय शिवराय क्रीडा मंडळ, मांगली (अरब) यांच्या सौजन्याने कबड्डी प्रेमिंसाठी भव्य रात्रकालीन कबड्डी चे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या भव्य कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद नागभीड तालुक्यातील नवखळा गावातील जय बजरंग कबड्डी संघाने मिळविले आहे. तर तळोधीच्या तिमुर्ती नाईट कबड्डी संघाला व्दितीय क्रमांकावर समाधान मानावं लागले. तृतीय क्रमांक मांगली (अरब) येथील जय शिवराय कबड्डी संघाने मिळविले आहे. कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघास काँग्रेस पार्टीचे चिमुर विधानसभा समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांच्याकडून 15 हजार रोख आहे. द्वितीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्याकडून 11 हजार रुपये रोख, तृतीय पारितोषिक माजी पंचायत समिती सदस्य अरविंद देशमुख यांच्याकडून 7 हजार रुपये रोख देण्यात आले._

_*सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.* तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुलभाऊ खापर्डे माजी सभापती नागभीड, प्रमोद चौधरी तालुका अध्यक्ष, मनोज लडके तालुका अध्यक्ष शिवसेना नागभीड, हरिभाऊ मुळे उपाध्यक्ष सं.तू.ना. पतसंस्था, मनोज वझाडे सामाजिक कार्यकर्ता, वकार खान सचिव शहर काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी, सुरज मेश्राम शहर अध्यक्ष युवक काँ.क. ब्रम्हपुरी, सरीताताई मेश्राम सरपंच मांगली (अरब), धर्मदास देशमुख उपसरपंच मांगली (अरब) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते._

_या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, कबड्डी हा ग्रामीण भागातील खेळ आहे. तरुणांची खेळाप्रती रुची वाढवणे आणि त्यांना अधिक प्रतिभावान बनविण्यासाठी अश्या स्पर्धांचा खूप मोठा वाटा असतो. कबड्डी स्पर्धेमुळे तरुणांमध्ये जो उत्साह, जिद्द आहे. ती अशीच कायम असली पाहिजेत. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली._

_स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जय शिवराय क्रीडा मंडळ, मांगली (अरब) च्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली._