*इंदिरानगर येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी*
*गडचिरोली:-दि.२२ फेब्रुवारी*
*विश्वकर्मा पांचाळ समाज दुर्गा चौक इंदिरानगर गडचिरोली यांच्या वतीने प्रभु श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी उपस्थित राहुन प्रभू श्री.विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.*
*याप्रसंगी प्रकाश येरोजवार,अरुण पगडपल्लीवार,अतुल राचमलवार,संतोष मुरमुवार, सुनील बद्देलवार,शेषराव पंचरलावार,अनिल शुद्धलवार,राहूल बोधपल्लीवार तसेच विश्वकर्मा पांचाळ समाज व दुर्गा चौक येथील नागरिक उपस्थित होते.*