*पत्रकार संघटने तर्फे किडनी ग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत*

93

*पत्रकार संघटने तर्फे किडनी ग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत*

 

*अहेरी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे आणि युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले यांचे हस्ते फळ व आर्थिक मदत करण्यात आले आहे*

 

अहेरी तालुका पत्रकार संघटना अहेरीचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे आणि युवा ग्रामीण पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले यांच्या नेतृत्वातील पत्रकार बंधूंच्या सहकार्याने रायगट्टा येथील किडनी ग्रस्त रुग्णाला आज आथिर्क मदत करण्यात आली.

 

गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्यातील राजाराम (खांदला)जवळील रायगट्टा येथील श्री सुधाकर आइदूला वय ४५ भगवंतराव आश्रम शाळेतील चतुर्थ श्रेनितील कर्मचारी असलेल्या रुग्णाची अचानक तबियत बिघडल्याने त्यांना ताबडतोब तेलंगाना मधील मंचेरियाल येथे हलवीण्यात आले.

परंतु तिथल्या डॉक्टरांने संदर्भसेवा देऊन तिथून वर्धा येथील सेवाग्राम दवाखान्यात भर्ती करण्यास सांगितले. परंतु तेथील डॉक्टरांनी दोन्हीही किडनी निकामी झाले आहेत असे चौकशीअंती म्हटल्यावर, रुग्णांना परत घरी आणण्यात आले.

ही बाब तालुका पत्रकार संघटना अहेरी व ग्रामीण पत्रकार असलेल्या पत्रकारांना माहिती मिळताच वेळेचा विलंब न करता रुग्णाच्या घरी रात्री जाऊन विचारपूस करण्यात केली.

अहेरी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे यांनी रुग्णाच्या किडनीचा बाबतीत शासनाकडे पाठपुरावा करू असे आइदूला कुटुंबाला सांगण्यात आले आहे.

या वेळी तालुका पत्रकार संघटनेचे सचिव रमेश बामनकर, उमेश पेंड्याला, सल्लागार सदाशिव माकडे, संघटक मुकुंदा दूर्गे,व्यंकटेश चालूरकर,सुरेश मोतकूरवार,आदी उपस्थित होते.