लॉइड्स इन्फिनिट फाउंडेशन च्या वतीने विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

231

लॉइड्स इन्फिनिट फाउंडेशन च्या वतीने विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन.

 

आज दिनांक 28-02-2024 रोजी, महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. दे सी. व्ही. रमण यांच्या जयंतीनिमित्त जगभरात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करत असल्याने आज एटापल्ली येथे लॉइड्स इन्फिनिट फाउंडेशन, लोहखान, सुरजागड च्या वतीने तालुका स्तरीय एक दिवसीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या वेळी श्री.मा. डॉ.आंधळे सर गट विस्तार अधिकारी प. स. एटापल्ली, श्री. मा. दिलीप बुराडे DGM- CSR विभाग,श्री. मा.कुमरे सर – गट शिक्षण अधिकारी, प.स.एटापल्ली,श्री मडावी सर – अतिरिक्त प्रशासकीय अधिकारी, श्री पठाण सर – वरिष्ठ अधिकारी शिक्षण विभाग,श्री.फगुवा सर AM, CSR विभाग. या मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. सदर आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनीत एकूण 213 मुले आणि 14 शिक्षकांनी सहभाग घेत एकूण 18 विज्ञान मॉडेल आणि 36 सादरकर्त्यांनी त्यांच्या विज्ञान प्रकल्पांचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले. सदर केलेल्या उपक्रमाचे परीक्षण श्री.मा. डॉ.अमिताब मल्लिक सर DgM पर्यावरण विभाग व श्री. मा. डॉ. कुमार स्वामी (सहाय्यक व्यवस्थापक) यांनी सर्व विज्ञान प्रयोग आणि मॉडेल्सचे निरीक्षण करून सर्वोत्कृष्ट चार मॉडेल्ससाठी क्रमवारी काढली. यात प्रथम पारितोषिक- कस्तुरबा गांधी बालिका हायस्कूल, एटापल्ली मधील कु.तन्वी रवींद्र कोसरे, कु.ज्योत्स्ना धार्मिक मिंच, द्वितीय पारितोषिक-उल्हास गोटा,व अनुर पुंगाटी, तृतीय पारितोषिक- Z.P. प्राथमिक शाळा, दुम्मे.कु श्रेया एकटी, प्रांजली झाडे तर चौथे पारितोषिक- साहिल मडावी,राजेश पेदपल्लिवार यांनी विजेते ठरलेत. त्या विद्यार्थांना उद्घाटक मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मंगल मशाखेत्री,कार्यक्रमाचे प्रस्तावना श्री. देवेंद्र हिरापुरे सर तर कार्यक्रमाचे आभार श्री.स्वप्नील शंभरकर सर यांनी केली. सदर विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याकरिता सर्व CsR टीम मेहनत घेतली आहे..