नवीन संच मान्यता निकषामुळे शिक्षकांची पदे कमी होणार
चामोर्शी
शालेय शिक्षण विभागाने २०२४-२०२५ साठी नवीन
संच मान्यता निकष जाहीर केले आहेत. १ ते ४ पर्यंतच्या शाळांना दोन शिक्षक मंजुर होते मात्र नवीन निकषानुसार २१ पटापेक्षा कमी पटाच्या शाळांना ४ पर्यंत एकच शिक्षक मंजूर केला आले. यामुळे दुर्गम भागातील, वाढिवस्तीवरील शाळेतील शिक्षकांचे पदे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार असल्याने हा जाचक
बदल रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी सांगीतले.
संतोष सुरावार म्हणाले, नवीन शिक्षक संचमान्यता निकषात शासनाने बदल करत २० पटा पेक्षा कमी पटाच्या शाळांना एक नियमीत शिक्षकांचे पद मंजूर केले आहे. यामुळे राज्यात दुर्गम भागातील वाडी वस्तीवरील शाळेतील विद्यार्थ्यांना चार वर्गासाठी एक शिक्षक मिळणार आहे. यामुळे शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होणार आहेत. दुर्गम वाडी वस्तीवरील शाळेत काम
करणाऱ्या शिक्षकांना चार वर्गांना
अध्यापन करत असताना सर्व
प्रशासकीय कामकाज ही करावे
लागते. आज पर्यंत पटाच्या
अटिशिवाय या शाळा मध्ये दोन
शिक्षक पदे मंजूर असताना नवीन
संच मान्यतेनुसार एक नियमित-शिक्षक व दुसरा सेवानिवृत्त
शिक्षक अशी पदे मंजूर केली
आहेत. जे युवा शिक्षक दीर्घकाळ
नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या
भविष्याचा विचार ही करणे
आवश्यक आहे. या नव्याने
आलेल्या अटी बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेकडून शासनाकडे
मागणी करणार आहे.
जाचक बदल रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असेही म्हणाले
नवीन संच मान्यता निकष १५ मार्च २०२४ पासून अमंलात आले आहेत. यात द्विशिक्षकी शाळांमध्ये ६० पटासाठी किमान दोन शिक्षक आहेत. तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी किमान १६ मुलांची अधिक आवश्यकता. हे तीन शिक्षक टिकविण्यासाठी किमान ७६ मुले आवश्यक, पटसंख्या दहापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त एक सेवानिवृत्त शिक्षक मिळणार. सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देणार, इयत्ता सहावी ते आठवी मध्ये एकच वर्ग असल्यास ३५
पर्यंत एक शिक्षक आणि त्यापुढे ५३ पटानंतर दुसरा शिक्षक मान्य होणार, तिसऱ्या शिक्षकांसाठी किमान ८८ पट लागणार आहे. यासह अनेक निकष संच मान्यतेच्या शासन निर्णयामध्ये आहेत. तसेच बऱ्याच अटी व शर्थीही आहे. याचा विचार केल्यास २०२४-२५ पासून शिक्षक संख्या मान्यतेचे प्रमाण खूप खाली येणार आहे. या नव्याने आलेल्या अटी बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेकडून शासनाकडे मागणी करून राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र करत पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचेही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी सांगीतले.



