इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार : काॅ. अमोल मारकवार
गडचिरोली : भारतीय जनता पक्ष हा जनहितविरोधी पक्ष आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपाच्या राजवटी जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढ झाली आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी उध्वस्त झाला आहे. भाजपाने निवडणूक रोखे व्यवहारातून मोठा आर्थिक फायदा करुन घेतला. त्या बदल्यात उद्योगपतींचे पंधरा लाख रुपये माफ केले. त्यामुळे देश कर्जबाजारी झालेला आहे.
भाजपा हा संविधान विरोधी,लोकशाही विरोधी असल्याने त्यांचा पराभव करने हे कम्युनिस्टांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भाजप विरोधातील इंडिया आघाडीच्या वतीने जो उमेदवार देण्यात येईल, त्या उमेदवाराच्या प्रचारात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ताकदीने पुढाकार घेऊन प्रचाराची धुरा सांभाळण्यात येणार आहे .
आरमोरी तालुक्यात मार्क्सवादी कमुनिष्ट पक्षातर्फे स्वतः निवडणूक प्रचार कार्यालय उभारुन काम करणार असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी सांगितले.