*रानटी हत्तीच्या हल्ल्यातील मृतक कुटुंबीयांना भाग्यश्री ताईंची आर्थिक मदत*

29

*रानटी हत्तीच्या हल्ल्यातील मृतक कुटुंबीयांना भाग्यश्री ताईंची आर्थिक मदत*

 

*भामरागड तालुक्यातील कियर व हिदूर गावाला दिली भेट*

 

*भामरागड:-* रानटी हत्तींच्या कळपातून भरकटलेल्या एका हत्तीने भामरागड तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घालून तीन निष्पाप लोकांचा बळी घेतला. तालुक्यातील कियर व हिदूर या गावात अक्षरशा दुःखाचा डोंगर कोसळला होता. याची माहिती मिळताच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी दोन्ही गावातील मृतक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट देऊन आर्थिक मदत केले.

 

२५ एप्रिल रोजी रानटी हत्तीने कियर येथील गोंगलु रामा तेलामी या इसमावर हल्ला करत जीव घेतला होता. त्याच्यानंतर त्याच हत्तीने रात्रीच्या सुमारास हिदूर गावात प्रवेश करत पूजेसाठी गावाबाहेर असलेल्या माता मंदिर ला जाऊन परत येणाऱ्या लोकांवर हल्ला केले.त्यात राजे कोपा आलामी, महारी देऊ वड्डे आणि वंजे झुरू पुंगाटी या तीन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना नागपूर येथे हलविले.

 

यातील राजे कोपा आलामीने २६ एप्रिल रोजी तर महारी देऊ वड्डे या महिलेने २८ एप्रिल रोजी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.तिसरी महिला वंजे झुरु पुंगाटी हिच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. मागील ३ एप्रिल पासून तर २६ एप्रिल पर्यंत या रानटी हत्तीने तेलंगाना सह महाराष्ट्रात धुमाकूळ घालत पाच बळी घेतले.भामरागड तालुक्यातील इतरही भागात या हत्तीने शेतीसह गरांची ही नुकसान केले आहे. या सर्व लोकांची भेट घेऊन ताईंनी शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहे.

 

*आई वडिलांचा छत्रछाया हरपलेल्या चिमुकल्यांना मिळणार मायेची ऊब*

कियर येथील गोंगलू रामा तेलामी यांच्यावर रानटी हत्तीने हल्ला करत ठार केले.गोंगलू यांना एक मुलगा आणि दोन मुली असे तीन अपत्य आहेत.त्या मुलांची आई अगोदरच वारल्याने तिन्ही मुलं सध्या आपल्या आपले मामा कोमटी पेका कुळयेटी यांच्याकडे आहेत. त्या रानटी हत्तीच्या हल्ल्यात वडिलांच्या मृत्यूनंतर तिन्ही मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांची छत्रछाया हरपली आहे.आता या तिन्ही मुलांची जबाबदारी भाग्यश्री ताई आत्राम यांनी स्वीकारली असून दोन मुलींना भामरागड येथील आपल्या आश्रम शाळेत आणि मुलाला गोंडवाना सैनिक विद्यालय,गडचिरोली येथे दाखल करण्याची ग्वाही ताईंनी दिली आहे.आता यापुढील शिक्षण ताई स्व खर्चातून उचलणार आहे. आता त्या चिमुकल्यांना चांगले शिक्षण मिळणार आहे.