*श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेमुळे समाजाच्या उन्नतीचे दालन खुले झाले* – अध्यक्ष गजानन भांडेकर

39

*श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेमुळे समाजाच्या उन्नतीचे दालन खुले झाले* – अध्यक्ष गजानन भांडेकर

*श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्था उद्घाटन समारंभ दि. 10/05/2024*

*गडचिरोली* :- गडचिरोली जिल्हयात बहुसंख्य असलेल्या तेली समाज बांधवांसाठी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव वर्षानंतर आर्थिक उन्नतीसाठी आणि विकासासाठी श्री संताजी नागरी पतसंस्थेमुळे समाजाच्या उन्नतीचे दालन खुले झाले आहे.यामुळे बहुसंख्य असलेल्या समाजातील गरजू लोकांना सुरक्षा ठेव,आवर्त ठेव,मुदत ठेव व कर्ज याची सोय उपलब्ध होणे अगत्याचे होते आणि ती गरज या पतसंस्थेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे असे मौलीक प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर – मार्कडेश्वर देवस्थान मार्कडादेव यांनी श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घघाटन समारंभाप्रसंगी केले,ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते‌.

यावेळी उद्घघाटक म्हणून जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटनेचे प्रभाकरजी वासेकर,प्रमुख अतिथी माजी प्राचार्य देवाजी सोनटक्के, कार्याध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती विठ्ठलराव कोठारे,माजी पोलीस पाटील सुखदेव बारसागडे ,श्री आबाजी चिचघरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक,संचालक किशोर उरकूंडवार प्रतिकार पतसंस्था जुनासुर्ला,भाजपा जिल्हा युवा महामंत्री मधुकरजी भांडेकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर,प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्था गडीसुरला चे अध्यक्ष पाटेवार सर,माजी अध्यक्ष जिल्हेवार सर प्रतिकार पतसंस्था, संचालक प्रा.शि.पतसंस्था किशोर कोहळे,अध्यक्ष हनुमान मंदिर देवस्थान मनोहरजी भांडेकर, मा.नगरसेवक तथा भाजपचे गडचिरोली शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे ,उपाध्यक्ष नगरपंचायत चामोर्शी लोमेशजी बुरांडे,अध्यक्ष संताजी नागरी सहकारी पतसंस्था भैय्याजी सोमनकर,उपाध्यक्ष संताजी नागरी सहकारी पतसंस्था राजेंद्रजी भुरसे आणि संचालक, प्रवर्तक,सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रतिकार पतसंस्थेचे संचालक किशोर उरकूंडवार, माजी प्राचार्य देवाजी सोनटक्के, उद्घघाटक प्रभाकरजी वासेकर यांनी आपले सहकार क्षेत्राचे अनुभव सोदाहरण व्यक्त केले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मधुकर भांडेकर,मुक्तेश्वर काटवे,विठ्ठल कोठारे,श्री पाटेवार सर यांनीही आपल्या मार्गदर्शनपर भाषणातुन उपस्थितांना श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक साईनाथ सोनटक्के , गजानन बारसागडे,सुनील सातपुते,लीलाधर वासेकर,विजय भांडेकर,सौ.शीलाताई सोमनकर,सौ.मीरा सातपुते,सौ. रोशनी राखडे,सौ.स्मिता भांडेकर आणि श्री संताजी नागरी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक साईनाथ सोनटक्के,प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष भैय्याजी सोमनकर तर आभार संचालक लिलाधर वासेकर यांनी मानले .